मॅट्रिकपूर्व शिक्षण फी , परिक्षा फी प्रदाने
उदिष्ट :-
दिनांक- २४ डिसेंबर,१९७० च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील इयत्ता १ ली ते १० वी मध्ये शिकत असणा-या व ज्या विद्यार्थ्याचे पालक महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असतील अशा विद्यार्थ्याचे वय व उत्त्पन्न विचारात न घेता सर्व स्तरावरील मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्याची शक्षणिक शुल्कांची प्रतिपूर्ती प्रमाणित दराने केली जाते.
शालेय शिक्षण विभागाच्या दि.१३ मार्च,१९९६ च्या शासन निर्णयान्वये प्रमाणित दराने शुल्क आकारणा-या शासन मान्यता प्राप्त व अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित मागासवर्गीय विद्यार्थ्याचे शिक्षण शुल्क व सत्र शुल्क अदा केले जाते.
उदिष्ट :-
खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये इ.१ ली ते १० वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या दारिदय रेषेखालील कुटुंबातील अनुसचित जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याची शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती सन-२०११-१२ शैक्षणिक वर्षापासुन दरवर्षी १० महिन्याच्या कालावधी करीता पुढील दराने मंजुर करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.
अनुसूचित जाती , विजा भज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याची इयत्ता निहाय प्रतिपुर्ती दर आर्थिक दृष्टया मागासलेले विद्यार्थीकरीता
१ वी ते ४ वी - रु.१००/- दर महा (१० महिन्यासाठी)५ वी ते ७ वी - रु.१५०/- दर महा (१० महिन्यासाठी)
८ वी ते १० वी - रु.२००/- दर महा (१० महिन्यासाठी)
Tags:
लाभाच्या योजना