राज्य शासकीय इतर पात्र कर्मचारी,सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दि.01 जुलै 2021 रोजी देय असलेल्या 7 वेतन आयोगाची थकबाकी (तिसऱ्या हफ्ता) त्याचे प्रदान करणेबाबत..
दि. 30 जानेवारी 2019 च्या सातव्या वेतन आयोगाबाबतच्या वित्त विभागाच्या अधिसूचनेनुसार सातव्या वेतन आयोगची थकबाकी सन 2019-20 पासून पुढील 5 वर्षात 5 समान हप्त्यात कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. थकबाकी कशी द्यावी याच्या कार्यपद्धतीबाबत शासनाने दि.20 फेब्रुवारी २०१९ रोजी शासन निर्णय काढलेले आहे तसेच राष्ट्रीय निवृत्ती योजना (NPS) अथवा परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन (DCPS) लागू असलेले कर्मचारी यांची थकबाकीची रक्कम 5 वर्षांमध्ये 5 समान हप्त्यात रोखीने अदा करण्याबाबत शासनाने दि. 30-5-2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
आज दि.09 मे 2022 रोजी आलेल्या शासन निर्णयानुसार जे राज्य शासकीय आणि इतर जे पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांना दि. एक जुलै 2021 रोजी देय असलेल्या 7 वा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता खालील प्रमाणे देण्यात येणार आहे.
1) निवृत्ती वेतन धारकांना त्यांच्या सातव्या वेतन आयोगाची थकबाकी रक्कम (तिसरा हफ्ता) माहे जून 2022 च्या निवृत्तिवेतना सोबत रोखीने अदा करण्यात येणार आहे.
2) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची थकबाकी रक्कम (तिसरा हफ्ता) माहे जून 2022 च्या वेतनासोबत मिळणार आहे व ती रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
3) तसेच सर्व जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची तिसऱ्या हफ्त्याची रक्कम सुद्धा माहे जून 2022 च्या वेतनासोबत मिळणार आहे व ती रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
4) जे NPS, DCPS धारक राज्य शासकीय कर्मचारी तसेच जिल्हा परिषदेतील, शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचारी आहेत त्यांना त्यांचा सातव्या वेतन आयोगाची तिसऱ्या हप्त्याची रक्कम माहे जून 2022 च्या वेतना बरोबर रोखीने मिळणार आहे.
त्याच प्रमाणे शासनाने काही सूचना दिलेल्या आहेत :-
1) कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात रक्कम जमा केल्यानंतर दि. 01 जुलै 2021 पासून त्याच्यावर व्याज अनुज्ञेय राहणार आहे.
2) भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात आलेली तिसऱ्या हप्त्याची रक्कम दि. 01 जुलै 2021 पासून दोन वर्षे म्हणजेच दिनांक 30 जून 2023 पर्यंत काढता येणार नाही.
अशाप्रकारे या शासन निर्णयानुसार सर्व पात्र कर्मचाऱ्यांना 01 जुलै 2021 रोजी देय असलेली सातव्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम सर्व पात्र कर्मचाऱ्यांना माहे जून 2022 च्या वेतनाबरोबर मिळणार आहे.
Good News
ReplyDelete