प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी अर्हता दिनांक 31 मे ऐवजी 30 जून
प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीसंबंधी दि.04/05/2022 रोजी आलेल्या शासन शुद्धिपत्रकानुसार बदली अर्हता दिनांक 31 मे ऐवजी 30 जून असा बदल करण्यात आलेला आहे.
हा अर्हता दिनांक फक्त सन 2022 या एका वर्षांपुरताच लागू आहे.
या शुद्धिपत्रकाचा लाभ फक्त 2019 मध्ये जे शिक्षक बांधव बदलीने अवघड क्षेत्रात गेले होते त्यांनाच होईल. कारण त्यावेळी बदल्या जून महिन्यात झालेल्या असल्यामुळे त्यांना अवघड क्षेत्रात तीन वर्ष पूर्ण होत नव्हते परंतु आजच्या शासन शुद्धीपत्रकानुसार 30 जून हा अर्हता दिनांक असल्यामुळे ते बदली अधिकारप्राप्त होतील व अवघड क्षेत्रातून बदलीचा यावर्षी लाभ घेऊ शकतील.
परंतु मागणी अशी होती की, तीन वर्ष सेवा बदलीसाठी ग्राह्य धरावी. परंतु असा बदल कुठेही केलेला दिसत नाही. त्यामुळे सर्वसाधारण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षक बांधवांसाठी शाळेवरील सेवा ३० जुन २०२२ पर्यंत पाच वर्ष आवश्यकच असेल.
आजच्या ३१ मे ऐवजी ३० जून बदली बाबतच्या पदावधीची परिगणना करण्याच्या शासन निर्णयाने होऊ घातलेले बदल-
१) संवर्ग एक मध्ये होणार अल्प प्रमाणात वाढ-
ज्या शिक्षकांची १ जून रोजी वयाची ५३ वर्षे पूर्ण होणार होती, ते शिक्षक यापूर्वी संवर्ग एक मध्ये येत नव्हते.मात्र आजच्या शासन निर्णयाने असे शिक्षक या संवर्गात येणार असल्याने या संवर्गातील संख्या अल्प प्रमाणात वाढणार आहे.
२) बदली अधिकार प्राप्त शिक्षक संख्येत होणार वाढ-
२०१९ या वर्षी बदल्या जून महिन्यात प्रत्यक्षात आल्याने व यातील काही शिक्षक अवघड क्षेत्रात कार्यरत झाले होते. नवीन बदली धोरणानुसार मागील काही शाळा आता अवघड क्षेत्रात येत नव्हत्या. परंतु मध्यंतरीच्या सूचनांनुसार अशा शाळांतील शिक्षकांना एवढ्या वर्षाकरिता बदली अधिकार प्राप्त ग्राह्य धरले जाणार असूनही अशा शिक्षकांना संधी मिळण्याची दारं बंदच होती. मात्र आजच्या आदेशाने अशा शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त म्हणून संधी मिळणार असल्याने संवर्ग तीन मधील संख्या बहुतांशी वाढणार आहे.
३) बदलीस पात्र शिक्षकांच्या संख्येत संभावते अल्प प्रमाणात वाढ-
काही शिक्षक २०१० या वर्षीच्या शिक्षक पात्रता परीक्षेत पात्र ठरूनही काही जिल्हा परिषदेच्या तांत्रिक विलंबामुळे जून २०१२ अखेरपर्यंत पदस्थापित झालेले तसेच एकतर्फी आंतरजिल्हा बदलीने १ जून ते ३० जून या कालावधीत सध्याच्या जिल्ह्यात रुजू झालेले असतील, असे शिक्षकही बदलीस पात्र यादी अल्प प्रमाणात वाढणार आहेत.