भाषिक उपक्रम
एका शब्दाच्या अक्षरापासून अनेक शब्द बनविणे.
'समान' या शब्दातील अक्षरे घेऊन पुढील सार्थक शब्द बनतात. जसे-मान, सन, मास, मानस, नस.
सरावासाठी खाली असे मूळ शब्द व त्यापासून बनविलेले सार्थक शब्द दिले आहेत.
(१) तलवार :- वाल, वार, वात, तर, तवा, रवा, तरल.
(२) आठवडा :- आठ, वडा, आठव, डाव, आव.
(३) सरपण :- सर, पण, सण, रण, रस, पसर.
(४) गायरान :- गाय, रान, गान, गारा.
(५) यवतमाळ :- माळ, तळ, तव, मात, माय, वय.
(६) नवनीत :- नव, वनी, वन, वतन, तन.
(७) हवामान :- हवा, मान, वान, नवा.
(८) नागपूर :- नाग, पूर, नार, गर, पू.
(९) पसरट :- पर, सर, पट, टर, रस, सट, पसर.
(१०) वासरू :- वास, सरू, वारू.
(११) अहमदनगर :- अहमद, नगर, नर, नग, मन, मदन, मगर, दम, हरण, गरम.
(१२) ताजमहाल :- ताज, महाल, हाल, महा, ताल, जहाल, लता, मल.
(१३) महाभारत :- महा, भारत, भार, मत, भात, हात, मर, रहा.
(१४) यशवंतराव :- यश, यशवंत, राव, तवा, वरात, वंश, रात, वय.
Tags:
विद्यार्थी हित