शब्द समूहासाठी एक शब्द
नमस्कार मित्रांनो, मराठीमध्ये शब्दसमूहासाठी एक शब्द ही एक संकल्पना आहे आणि अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये या संदर्भातले प्रश्न विचारले जातात तर याचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी त्यांच्या सरावासाठी असे शब्द देण्यात येत आहेत.
(१) नारळाचे झाड :- माड .
(२) नारळाच्या फांद्या :- झावळी
(३) सिमेंट तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल :- चुनखडक.
(४) मीठ तयार करतात ते ठिकाण :- मिठागर
(५) प्राणी पाळणे :- पशुपालन
(६) माणूस चंद्रावर गेला ते साधन :- अंतराळयान
(७) 'अश्म' म्हणजे :- दगड
(८) जंगलातील मोठ्या प्रमाणातील आग :- वणवा
(९) थंडीत उबेसाठी पेटवतात :- शेकोटी
(१०) रुळावरून धावणारे वाहन :- आगगाडी.
(११) पृथ्वीचा आकार :- गोल
(१२) तालुक्याला असेही म्हणतात :- तहसील
(१३) नदीचे काठ :- तीर /थडी.
(१४) खाणीतून काढलेले पदार्थ :- खनिज
(१५) माश्यांना असेही म्हणतात :- मासळी.
(१६) वनस्पतीचा जमिनीत वाढणारा भाग :- मूळ
(१७) उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह :- धबधबा
(१८) किल्ल्याच्या सभोवतालची भिंत :- तट.
(१९) कैदी ठेवण्याची जागा :- तुरुंग
(२०) चार रस्ते एकत्र येतात ती जागा :- चौक
(२१) जमिनीखालील गुप्त मार्ग :- भुयार
(२२) जमिनीवर राहणारे प्राणी :- भूचर
(२३) जमिन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी :- उभयचर
(२४) पाण्यात राहणारे प्राणी :- जलचर
(२५)दगडावर/दगडाच्या मूर्ती घडवणारा :- शिल्पकार
(२६) दगडावर कोरलेले लेख :- शिलालेख
(२७) तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण :- तिठा
(२८) न्यायनिवाडा करणारा :- न्यायाधीश
(२९) प्रचंड वेगाने वाहणारा वारा :- वादळ
(३०) सायकलच्या ट्युबमध्ये असणारा वायू पदार्थ :- हवा.