शालांत पूर्व शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती
उदिष्ट :-
अपंग विद्यार्थ्याना शिक्षणासाठी प्रोत्याहित करणे
निकष :-
१. इयत्ता १ ली ते १० वी पर्यतचे शिक्षण घेणारे अंध,अंशतः अंध, कर्णबधीर व अस्थिविकलांग, मतिमंद, मानसिक आजार व कुष्ठरुग्णमुक्त अपंग विद्यार्थ्यास देण्यात येईल.
२. कर्णबधिर विद्यार्थीच्या बाबतीत पायरी वर्गातील विद्यार्थ्याना या योजनेचा लाभ देण्यात येईल.
३. मतिमंद व मानसिक आजार असलेल्या विद्यार्थ्याच्या बाबतीत इयत्तेचा निकष न लावता नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त मतिमंदाच्या विशेष शाळांतील प्रवेशित विद्यार्थ्याना वयाची १८ वर्षे पुर्ण होईपर्यत या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येईल.
४.अर्जदार शासन अनुदानित वसतिगृहात अथवा अनुदानित निवासी शाळेतील निवासी विद्यार्थी नसावा.
५.अर्जदार हा सामान्य शाळेत अथवा अपंगांच्या विशेष शाळेत शिक्षण घेत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
६. अर्जदार एकाच वर्गात एका वेळापेक्षा जास्त वेळ अनुत्तीर्ण झाल्यास शिष्यवृत्ती बंद करण्यात येईल.
७. अर्जा सोबत वार्षिक परीक्षेच्या निकालाची प्रत (गुणपत्रिकेची सत्यप्रत) जोडणे आवश्यक राहिल.
८. अर्जदारने अर्जासोबत अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि संपुर्ण सहभाग) अधिनियम १९९५ प्रमाणे अपंगांसाठी स्थापन करण्यात आलेले वैद्यकीय मंडळाचे अपंग असल्याचे प्रमाणत्राची सत्यप्रत अर्जासोबत जोडलेल असावे.
९.अर्जदार गुणवत्ता शिष्यवृत्ती खेरीज इतर कोणतीही शिष्यवृत्ती घेतलेला नसावा.
१०. या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नची मर्यादा नाही.
लाभाचे स्वरुप :-
इ. १ ली ते ४ थी | रु.१००/- दर महा |
इ. ५ वी ते ७ वी | रु.१५०/- दर महा |
इ.८ वी ते १० वी | रु.२००/- दर महा |
मतिमंद व मानसिक विकलांग | (नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त विशेष शाळेतील) दर महा रु.१५०/- |
Tags:
लाभाच्या योजना