अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
अस्वच्छ व्यवसाय काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती समाजकल्याण विभागांतर्गत येणारी ही शिष्यवृत्ती आहे.
उद्देश :-
अस्वच्छ व्यवसाय काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांना समाज प्रवाहात आणण्यासाठी सदर शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आलेली आहे.
या शिष्यवृत्ती मध्ये केंद्र शासनाने सुधारणा केली असून त्याची अंमलबजावणी दिनांक ०१-०४-२००८ पासून लागू करण्यात आलेली आहे.
अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती साठी अटी व शर्ती :-
- अस्वच्छ व्यवसाय काम करणारे, परंपरेने सफाई कामगार, कातडी सोलणे, कातडी कमावणे व कागद, काच, कचरा गोळा करणे या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींच्या पाल्यांना सदर शिष्यवृत्ती अनुज्ञेय आहे.
- ही शिष्यवृत्ती सर्व जाती व धर्माला लागू आहे.
- ही शिष्यवृत्ती योजना केंद्र पुरस्कृत असून यासाठी कोणतीही उत्पन्नाची अट नाही.
- अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना ग्रामसेवक, नगरपालिका मुख्याधिकारी, महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त, प्रभाग अधिकारी यांचेकडून अस्वच्छ व्यवसाय करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती अंतर्गत मिळणारे लाभ :-
- निवासी दरमहा 700 रु 10 महिन्यासाठी व तदर्थ अनुदान 1000/- असे एकुण 8000/- रु.
- अनिवासी दरमहा रु 225/- 10 महिन्यासाठी व तदर्थ अनुदान रु 750 असे एकुण 3000/- रु.
Tags:
लाभाच्या योजना