प्रस्तावना :-
समाताधिष्टीत आधुनिक भारतीय समाज निर्मितीकरिता थोर महापुरुषांनी आणि आपले आयुष्य वेचले. महात्मा ज्योतिबा फुले हे या समाजक्रांतीचे अग्रदूत होत. समता,न्याय,आणि बंधुता या त्रितत्वावर आधारित आधुनिक समाज स्थापनेकरिता त्यांनी स्वतःच्या घरूनच समाजक्रांतीचे रण फुंकले.विषमतावादी आणि परंपरावादी निष्क्रिय भारतीय समाजात समतामूलक तत्वांनी आणि विचारांनी तेजोमय केले. स्त्रीशिक्षण, अस्पृश्यांना शिक्षण, बालविवाह प्रतिबंधक, विधवाविवाह, शेतीसुधारणा, अनाथाश्रम, भ्रूणहत्या प्रतिबंध, विधवा केशवपन बंदी इत्यादी विविध सामाजिक क्षेत्रात त्यांनी क्रांतिकारी कार्य केले. एवढेच नाही तर सत्यशोधक समाजाची स्थापना करून मानवतावादी नवसमाजाची मुहूर्तमेढ रोवली आणि आधुनिक पुरोगामी महाराष्ट्राचे जनक ठरले.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे आधुनिक समाजाचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या कमकुवत घटकांच्या सर्वसमावेशक, सर्वांगीण, शाश्वत विकासाकरिता महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची स्थापना 08 ऑगस्ट 2019 ला करण्यात आली. ही संस्था महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग,विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या घटकातील सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक विकास, संशोधन, रोजगाराभिमुख वृद्धी, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, ग्रामीण विकास, शेती विकास, व्यक्तिमत्व विकास, स्पर्धात्मक विकास, सामाजिक सलोखा आणि तत्सम क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवून आधुनिक कटिबद्ध समाज निर्मिती करिता स्वतःला समर्पित करण्यास कटिबद्ध आहे.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण MHT-CET/NEET/JEE 2024 करिता महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना MHT-CET/NEET/JEE 2024 करिता पूर्ण प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षेकरिता इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना MHT-CET/NEET/JEE 2024 चे पूर्व प्रशिक्षण महाज्योती मार्फत देण्यात येणार आहे. MHT-CET/NEET/JEE 2024 चे प्रशिक्षण 15 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे तसेच प्रशिक्षणाबरोबर पुस्तके व इतर साहित्य पुरविण्यात येणार आहे.
योजनेच्या लाभासाठी पात्रता :-
- उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
- इतर मागास वर्ग, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी.
- उमेदवार नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा/असावी.
- ज्या उमेदवारांनी 2022 मध्ये दहावी परीक्षा दिलेली आहे उमेदवार अर्ज भरण्यास पात्र आहेत,अशा उमेदवारांनी अर्ज करताना दहावी परीक्षा प्रवेश पत्र जोडून अर्ज करावा.
- वरीलप्रमाणे अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 65 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांनी सादर ऑनलाइन करावयाच्या गुण पत्रकाच्या आधारे व एकूण क्षमतेच्या मर्यादेत- अंतिम निवड यादीत समावेश केला जाईल.