आयकराबाबत (इन्कम टॅक्स) महत्त्वपूर्ण माहिती..
या वर्षी एवढा टॅक्स कसा काय लागला? मागच्या वर्षी तर नव्हता लागला?
किंवा
या वर्षी एवढे कागदपत्रे का मागत आहे? मागच्या वर्षी तर नव्हते मागितले?
👆🏽
वरील वाक्ये या वर्षी प्रत्येक कर सल्लागाराच्या/वकिलाच्या/सिएच्या ऑफिस मध्ये करदात्या कडून ऐकायला मिळत आहेत.
तर मित्रानो लक्षपूर्वक खालील माहिती वाचा.
👇🏼
इनकम टॅक्स डिपार्टमेंटने अशी वेबसाईट विकसित केली आहे की प्रत्येक PAN/AADHAR नंबर वर होणारा आर्थिक व्यवहार आता सहजपणे आयकर खात्याला विनासायास प्राप्त होत आहेत.
सदर व्यवहारांची संपुर्ण माहिती A.I.S. म्हणजेच Annual Information Statement व T.I.S. म्हणजेच Taxpayers Information Summery व सोबतच 26AS या माहिती पत्रकात Income Tax च्या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
रिटर्न भरण्यापूर्वी करदात्याला त्याच्या सगळ्या प्रकारच्या आर्थिक व्यवहाराची माहिती पडताळून पाहण्यासाठी व त्या अनुषंगाने आपापले इनकम टॅक्स रिटर्न भरणे सोपे जावे यासाठी ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मागील वर्षीपासून Income Tax Return भरण्यापूर्वी वरील सदर माहिती आपल्या रिटर्न मध्ये दाखविणे अनिवार्य झाले आहे.
सहसा नोकरपेशा करदाते फक्त सॅलरी बेस वर आपापले रिटर्न आज पर्यंत भरत आले असावेत.
एकदा Form No 16 दिला किंवा पगाराची माहिती दिली की सुटलो असा समज असे.
थोड्याबहुत प्रमाणात व्यापारी/व्यवसायी वर्गात पण हेच चित्र असायचे.
परंतु आता मात्र यापुढे ताकच काय पाणी सुध्दा फुंकून प्यावे लागेल.
कोणत्याही करदात्यांनी AIS व TIS मधील माहिती न पडताळता रिटर्न भरले तर त्याला इनकम टॅक्स ऑफिस कडून नोटीस येऊ शकते.
इनकम टॅक्स हा सर्व मार्गातून मिळालेल्या इनकम वर लागत असतो, मग ते शेती सोडून कोणतेही उत्पन्न असो.
उपरोक्त AIS व TIS मध्ये खालील काही मोजक्या व महत्वाच्या आर्थिक व्यवहाराची माहिती उदाहरणा दाखल दिलेली आहेत.
- बँकेतील बचत खात्या वरील व्याज.
- बँकेतील Fixed Deposit / Term Deposit वरील व्याज.
- पगारापासून मिळणारे उत्पन्न.
- Shares ची खरेदी व विक्री.
- Mutual Fund ची खरेदी व विक्री
- SIP म्हणजेच Systematic Investment Plan.
- बॉण्ड चा व्यवहार.
- पोस्ट ऑफिस मधील व्यवहार.
- चल ,अचल स्थावर मालमत्तेची खरेदी किंवा विक्री.
- वेगवेगळ्या कंपन्यांचे Divident, कमिशन.
- 10 लाखवरील सर्वच प्रकारचे व्यवहार.
- SFT म्हणजेच Specified Financial Transactions
- करकपात झालेले म्हणजेच TDS केलेले सर्वच प्रकारचे व्यवहार.
इत्यादी..... इत्यादी.....
इत्यादी.... 50 पेक्षा जास्त प्रकारच्या आर्थिक व्यवहाराची माहिती उपरोक्त AIS व TIS मध्ये असल्याने रिटर्न भरतांना सदर माहिती लपविल्या जाऊच शकत नाही आणि त्या आधारावर येत असलेला टॅक्स भरावाच लागेल हे पक्के ध्यानात ठेवावे लागेल.
मागील वर्षापर्यंत अनेक प्रकारची माहिती लपविल्या जाऊ शकत होती. सहसा Shares किंवा Mutual Fund चे व्यवहार लपविल्या गेल्याचे प्रकर्षांने निदर्शनास आले आहेत. पण तंत्रज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की, त्यामुळे सगळ्याच व्यवहारावर CCTV लागले आहेत असे समजले तरी गैर होणार नाही.
येणाऱ्या काही दिवसात याची आणखी व्याप्ती वाढलेली दिसेल.
त्यामुळे येईल तो टॅक्स भरून शांत झोप घेणे कधीही चांगलेच राहील, करचोरी करणे आता सोपे राहिले नाही.
याचा अर्थ हा नाही की, आपण व्यवहार किंवा व्यापार करू नये किंवा करतांना भीती बाळगुन व्यवहार करावे. असे अजिबात नाही. सर्वच व्यवहार सुरळीतपणे चालू राहू द्यावे. फक्त आता आर्थिक शिस्त लावणे गरजेचे झाले आहे एवढेच
कायदेशीर मार्गे कर वाचविण्याचे सर्वच पर्याय नियमाप्रमाणे उपलब्ध राहणारच आहे.
आता राष्ट्र प्रथम ही भावना लक्षात घेऊन समर्पित भावनेने कर भरून राष्ट्रिय कर्तव्य मात्र पार पाडावे लागेल.
आयकर विवरण पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती. त्यानतंर रु. 1000 ते 5000/- पर्यंत दंड आहे.
🙏🏼धन्यवाद!!
@RudraTech